आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : मनसे अध्यक्ष 1 मे रोजी राज ठाकरे यांची औरंगाबाद येथे सभा पार पडली. या सभेत राज पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं.
ईद (3 मे) नंतर मशिदींवरचे भोंगे उतरले नाही तर 4 मे पासून बिना परवानगीचे भोंगे असलेल्या मशिदींसमोर दुप्पट आवाजात भोंगे लावून हनुमान चालिसा पठण झालेच पाहिजे, असा राज यांनी यावेळी सरकारला इशारा दिला. त्यानंतर राज ठाकरेंनी भोंग्यावरून हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा एक जुना व्हिडिओ ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना शिवसेनेच्या भूमिकेची आठवण करून दिली होती. यावरून आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हे ही वाचा : राम मंदिर आंदोलनापासून मंदिर उभारणीपर्यंत ठाकरे कुटुंबीयांचा यात काहीही संबंध नाही; भाजप नेत्याचं वक्तव्य
बाळासाहेबांना ज्यांनी जिवंतपणे त्रास दिला, तेच त्यांच्या आता क्लिप फिरवत आहेत, असा घणाघात संजय राऊतांनी राज ठाकरेंवर केला. ते पुण्यातील हडपसर येथे बोलत होते.
बाळासाहेब ठाकरे यांनी व्यंगचित्रकार म्हणून जी क्रांती केली ती शब्दात व्यक्त करता येणार नाही. बाळासाहेबांच्या हातात कुंचला नसता तर आज शिवसेनेचे आंदोलन उभं राहिलं नसतं. ही मशाल तुम्हांला महाराष्ट्रात पेटली दिसली नसती. आज महाराष्ट्रात पेटवापेटवीची भाषा करत आहेत. आमचं अख्ख आयुष्य पेटवा पेटवीत गेलंय, असा टोला संजय राऊतांनी राज ठाकरेंना यावेळी लगावला.
महत्वाच्या घडामोडी –
…तर राज ठाकरेंना अयोध्येत येऊ देणार नाही; भाजपच्या ‘या’ खासदाराचा इशारा
“तुम्ही मशिदींवरील भोंग्यांचं राजकारण सुरू केलं, आणि आता ते हिंदुंच्या गळ्यापर्यंत आलं”
हनुमान चालिसावर वकील गुणरत्न सदावर्तेंनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…