मुंबई : शरद पवारांच्या ड्रॉव्हरमधून 54 आमदारांची यादी चोरून राज्यपालांना सादर करणे कोणत्या नैतिकतेत बसते? तरीही ते शहाणपणा शिकवतात? असं म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांवर निशाणा साधला होता. यावर आता राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
दिल्लीतील चौकीदारचं लक्ष देशाच्या तिजोरीवर आणि गल्लीतल्या ठेकेदारचं लक्ष सिल्वर ओक च्या ड्राव्हरवर. करवीरच्या खजिन्यावर असाच डोळा असेल म्हणुन करवीरकरांनी हाकललं,नंतर कोथरूड शोधावं लागलं. नैतिकता विकणाऱ्यांनी नैतिकतेवर बोलल की लोकं चंपा म्हणतात., असा टोमणा अमोल मिटकरी यांनी चंद्रकांत पाटलांना लगावला.
दिल्लीतील चौकीदारचं लक्ष देशाच्या तिजोरीवर आणि गल्लीतल्या ठेकेदारचं लक्ष सिल्वर ओक च्या ड्राव्हरवर. करवीरच्या खजिन्यावर असाच डोळा असेल म्हणुन करवीरकरांनी हाकललं,नंतर कोथरूड शोधावं लागलं. नैतिकता विकणाऱ्यांनी नैतिकतेवर बोलल की लोकं चंपा म्हणतात.@TV9Marathi https://t.co/SHkl6fRhIr
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) June 6, 2021
महत्वाच्या घडामोडी –
… तर मुंबईत चित्रीकरणासाठी परवानगी देणार- उद्धव ठाकरे
“पवारांच्या ड्रॉव्हरमधून आमदारांची यादी चोरून राज्यपालांना सादर करणे कोणत्या नैतिकतेत बसते?”
उद्धव ठाकरेंनी खुर्चीसाठी बाळासाहेब ठाकरेंचे विचारच गाडून टाकले- निलेश राणे
खाकीवर डाग असणाऱ्या विकृतांना तात्काळ धडा शिकवा- चित्रा वाघ