मुंबई : पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेसची सत्ता आल्यानंतर तिथे मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरु आहे. निवडणूक निकालानंतर भाजप कार्यकर्त्यांच्या हत्या, त्यांच्या घरांवर हल्ला, घरांना आग लावणं, लूटमारीच्या अनेक घटना घडत आहे. यावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
विचारांची लढाई विचारांनी लढली जावी,तिथे हिंसाचारास थारा नसावा! निवडणुकीनंतर बंगालमध्ये सुरू असलेला हिंसाचार अतिशय निंदनीय असून, हे थांबले पाहिजे! बंगालमध्ये वाघीण जिंकली म्हणणारे, हिंसाचाराच्या घटनेवर मुग गिळून गप्प आहेत! अशा घटनांचे समर्थन होऊ शकते का?, असं ट्विट करत दरेकरांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.
विचारांची लढाई विचारांनी लढली जावी,तिथे हिंसाचारास थारा नसावा! निवडणुकीनंतर बंगालमध्ये सुरू असलेला हिंसाचार अतिशय निंदनीय असून, हे थांबले पाहिजे!
बंगालमध्ये वाघीण जिंकली म्हणणारे, हिंसाचाराच्या घटनेवर मुग गिळून गप्प आहेत!
अशा घटनांचे समर्थन होऊ शकते का? #BengalBurning— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) May 4, 2021
महत्वाच्या घडामोडी –
सांगलीत उद्या मध्यरात्रीपासून कडक लाॅकडाऊन; पालकमंत्री जयंत पाटील यांची घोषणा
“चंद्रकांत पाटील यांनी छगन भुजबळांची तात्काळ माफी मागावी”
तुम्ही सांगाल ते करायला न्यायदेवता म्हणजे सीबीआय, ईडी नाही; भुजबळांचा पलटवार
“…तर भाजप महाराष्ट्रात दुर्बिण घेऊन शोधला असता तरी सापडला नसता”