शरद पवारांवर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांना लाजा वाटल्या पाहिजेत; छगन भुजबळ संतापले

0
382

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिने राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यावर शुक्रवारी एक वादग्रस्त पोस्ट शेअर केली होती. तिच्या या पोस्टवर अत्यंत संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यातच राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी जोरदार टिका केली आहे.

शरद पवारांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून सोशल मीडियातून आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांना लाजा वाटल्या पाहिजेत. अशा लोकांवरती ताबडतोब कारवाई झाली पाहिजे, असं छगन भुजबळ म्हणाले आहेत.

हे ही वाचा : खोटा हिंदुत्वाचा बुरखा घातलेला पक्ष आपल्यासोबत होता, त्यामुळे…; उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी कवितेमधून समाजाचं दु:ख मांडलं होतं. मात्र, त्याचा चुकीचा अर्थ लावून टिका करणे योग्य होणार नाही. पवारांच्या आजारावरही टिका केली आहे. हे चुकीचं आहे, असंही  छगन भुजबळांनी म्हटलं आहे.

दरम्यान, अभिनेत्री अथवा कोणीही असो त्यांच्यावर कारवाई करावी. हे चीड आणणारे आहे. यामागे मनुवाद आहे का?, असा सवालही छगन भुजबळांनी केला.

महत्वाच्या घडामोडी –

कोण आहे नवनीत राणा?, त्या…; विद्या चव्हाण यांची जीभ घसरली

“शरद पवारांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणं पडलं महागात, अभिनेत्री केतकी चितळेला पोलिसांकडून अटक”

औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेणाऱ्या अकबरुद्दीन ओवेसींना संजय राऊतांचं जोरदार उत्तर, म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here