पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे 10 सेकंद थांबून विचारपूस करायला जी माणुसकी लागते ती सुद्धा नाही, असं म्हणत बीडमध्ये अजित पवार यांच्या ताफ्यासमोर करण्यात आलेल्या आंदोलनावरुन भाजपाचे माजी खासदार निलेश राणे यांनी टीका केली होती. त्याला अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलंय. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.
ज्यांना काही उद्योग नाहीत ते अशी टीका करत असतात. टीका कोण करत आहे…म्हणजे ती व्यक्ती कोण आहे यावरुन त्या टीकेला महत्व असतं. त्यांच्या टीकेकडे कोण लक्ष देतं, असं अजित पवार म्हणाले आहेत
दरम्यान, जे येतात त्या सर्वांना मी भेटत असतो. मी लोकांमध्ये राहणारा कार्यकर्ता आहे. 30 वर्षांपासून हेच काम करत असून पुढेही जनतेचा पाठिंबा आहे तोपर्यंत तेच करणार आहे. मी बैठकीतून बाहेर पडल्यानंतर काहीजण एकदम आडवे आले, आमचा ताफा निघतो तेव्हा रस्ता मोकळा असतो,त्यामुळे असं कोणी वाहनासमोर येऊ नये. आम्ही वेळ दिली होती, भेटा, चर्चा करा निवदेन द्या…चर्चेची तयारी आहे,” असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
कुणी कितीही शड्डू ठोकले तरी पुढील महापाैर सुद्धा शिवसेनेचाच होणार- किशोरी पेडणेकर
सत्ता गेल्यानं भाजपचा जीव कासावीस झालाय- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
संजय राऊत काय शिंगावर घेणार?, त्यांना शिंग आहे कुठे?- नारायण राणे
“शिवसेना ही शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर चालते, शिवसैनिक भगिनींवर वार करणार नाहीत”