5 वर्षे ज्यांनी गृहखातं सांभाळलं तेच पोलिस खात्यावर संशय व्यक्त करत आहेत; मुश्रीफांचा फडणवीसांना टोला

0
132

अहमदनगर : राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना जोरदार टोला लगावला आहे. हसन मुश्रीफ यांच्या हस्ते अहमदनगरला झेंडा वंदन पार पडले. यावेळी ते बोलत होते.

ज्यांनी 5 वर्षे राज्याचं गृहखातं सांभाळलं त्यांचाच सुशांत सिंह प्रकरणात पोलिसांवर विश्वास नाही. हे दुर्दैवी आहे, असं मत हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केलं. यावेळी हसन मुश्रीफ यांनी भाजप अभिनेत्यावर सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणावरुन राजकारण करत असल्याचा आरोपही केला.

दरम्यान, देवेंद्र फडणवीसांनी सुशांत सिंह राजपूत प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली. त्यानंतर त्यांना बिहारच्या निवडणुकीची जबाबदारी देण्यात येत आहे. हे राजकारण आहे. 5 वर्षे ज्यांनी गृहखातं सांभाळलं तेच आपल्या पोलिसांवर संशय व्यक्त करत आहेत हे दुर्दैव आहे, असाही टोला हसन मुश्रीफ यांनी देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

…याची भारताला मोठी किंमत मोजावी लागेल; राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

पुणे ग्रामीण भागात अँटिजेन चाचणी किटसाठी निधी देणार- अजित पवार

पंतप्रधानांनी कोरोना वॅक्सिनबद्दल दिली ‘ही’ मोठी गुड न्यूज

केंद्रीय गृहमंत्रालयाकडून पोलीस पदकांची घोषणा; राज्यातील 58 पोलिसांना पुरस्कार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here