पुणे : ज्यांचा मुख्यमंत्री असतो, त्यांचंच सरकार असतं, हे लक्षात घ्या, असं विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं. ते पुण्यातील जून्नर तालूक्यातील शिवसेनेच्या मेळाव्यात बोलत होते.
शिवसेनेची गरज सगळ्यांना लागते. राष्ट्रवादीला लागते, काँग्रेसला लागते आणि भारतीय जनता पक्षाला सुद्धा लागतेच. याला पॉवर म्हणतात, लक्षात घ्या. महाराष्ट्रामध्ये सरकार आहे. तीन पक्षाचं सरकार आहे, ठीक आहे. पण तीन पक्षाचं सरकार असलं तरी ज्यांचा मुख्यमंत्री असतो, त्यांचंच सरकार असतं. हे लक्षात ठेवा, असं संजय राऊत म्हणाले. तसेच पुढे बोलताना संजय राऊतांनी आपलं वक्तव्य सावरण्याचं प्रयत्न केला.
हे ठाकरे सरकार आहे ना, हे कालं झालं, आता झालंय, दुसऱ्या कुठल्या पक्षाच्या नावाचं सरकार नाही. ठिक आहे पण सगळे आपलेचं आहेत., असं म्हणत संजय राऊतांनी आपलं वक्तव्य सावरण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, संजय राऊतांच्या या विधानामुळं महाविकास आघाडीत वाद होण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताचा आणखी एक जलवा! बॅडमिंटनमध्ये प्रमोद भगतनं पटकावलं सुवर्णपदक”
जावेद अख्तर यांनी अफगाणिस्तानात जाऊन अतिरेक्यांसोबत राहावं- चंद्रशेखर बावनकुळे
भाजपमध्ये महिलांचा सन्मान होत नाही; भाजपच्या ‘या’ आमदाराचा पक्षाला घरचा आहेर
पडळकर हे अज्ञानी बालक, त्यांना त्यांचं मूळच माहीत नाही; विजय वडेट्टीवार यांचा टोला