“ज्यांनी ज्यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली, त्यांना आता उत्तर मिळालं असेल”

0
660

पुणे : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणाऱ्या  रेणू शर्मा यांनी आपली तक्रार मागे घेतली. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.

धनंजय मुंडे यांच्याबाबत जे काही घडलं होतं त्यामध्ये आम्ही त्यांना पाठीशी घालत आहोत असे आमच्यावर आरोप झाले. आम्ही संपूर्ण तपास होऊ द्या, सत्य बाहेर येऊ द्या, असं म्हणत होतो. यात धनंजय मुंडे आणि आमच्या पक्षाची बदनामी झाली. आम्हाला नाहक त्रास सहन करावा लागला, असं अजित पवार म्हणाले.

दरम्यान, ज्यांनी ज्यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यांना आता उत्तर मिळालं असेल. बहुजन समाजातून पुढे आलेला एक सहकारी नेता बदनाम होतो. अशा वेळी त्याचे कुटुंबही व्यथित होते. अशा चुकीच्या गोष्टींना जबाबदार कोण? अशा घटना जेव्हा घडतात, तेव्हा त्या नेत्याला एक क्षणात पायउतार व्हावं लागतं, याचा जरा सगळ्यांनी गांभीर्याने विचार करायला पाहिजे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“एवढा गंभीर विषय सत्तेच्या शक्तीसमोर दाबण्याचा प्रयत्न तर झाला नाही??”

महाराष्ट्रातील नैतिकता संपली का?; धनंजय मुंडेंविरोधातील तक्रार मागे घेतल्यानंतर चंद्रकांत पाटील संतापले

… म्हणून मी तक्रार मागे घेतेय; रेणु शर्मांचा मोठा खुलासा

सीरमच्या आगीमागे घातपात होता की अपघात हे चौकशीनंतर कळेल- उद्धव ठाकरे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here