सांगली : एमपीएससी आयोगाच्या सदस्य नेमणुकीच्या बाबतीत राज्यपालांना 31 जुलैआधी याद्या पाठवल्याचं राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी म्हटलं होतं. यावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी प्रतिक्रिया दिली.
आपल्या घरगुती वादात, दुसऱ्या पाल्यांचं भविष्य अंधारात लोटू नका. नीट वाचता न येणाऱ्या आमदार रोहित पवारांनी केंद्रावर नुसते सल्ले देण्याचे उद्योग बंद करावे, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी रोहित पवार यांच्यावर केली. ते सांगलीतील झरे या गावात बोलत होते.
दरम्यान, नियुक्त्यांबाबत घोषणा करुन 30 दिवस उलटले. रोहित पवारांनी सांगितलं होतं, पण आता 31 तारीख उलटून गेली. लबाडी करण्यात हे माहीर आहेत, पण आता ते स्वत:च यावर वारंवार शिक्कामोर्तब करत आहेत, असा टोला गोपीचंद पडळकरांनी रोहित पवारांना लगावला
महत्वाच्या घडामोडी –
राज्यात जर पोलीसच संरक्षण देणार नसतील, तर…; मलंगगड प्रकरणावरून चित्रा वाघ पोलिसांवर संतापल्या
“ऑलिम्पिकमध्ये भारताच्या झोळीत आणखी एक पदक, बाॅक्सर लवलीनानं कांस्यपदकावर कोरलं नाव”
“अमित शहा संसदेत आले आणि निवेदन दिलं, तर मी टक्कल करेन आणि तुमच्या कार्यक्रमात येईन”
वेळ पडल्यास बुलडोझरखाली आडवे पडू, पण…; प्रवीण दरेकरांचा राज्य सरकारला इशारा