मुंबई : केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर जवळपास दोन महिन्यांपासून शेतकरी संघटना आंदोलन करत आहे. या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी आज मुंबईतील आझाद मैदानात हजारोंच्या संख्येने राज्यभरातील शेतकरी आंदोलनासाठी एकत्र आले आहेत, त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संबोधित केलं.
“ही लढाई सोपी नाही. कारण, ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांना देशातील कष्टकऱ्यांबद्दल व शेतकऱ्यांबद्दल कवडीची आस्था नाही, असं म्हणत शरद पवारांनी केंद्र सरकारवर निशाणा साधलाय.
दरम्यान, आपण पाहत आहात, 60 दिवस झाले उन्हातान्हात थंडी वाऱ्याचा विचार न करता शेतकरी आंदोलन करत आहेत. देशाच्या पंतप्रधानांनी कधी त्यांची चौकशी केली का?” असा सवालही शरद पवार यांनी यावेळी केला आहे.
महत्वाच्या घडामोडी-
“राष्ट्रवादी सोडून गेलेले अनेक जण लवकरच पक्षात परत येणार”
गायींची जशी पूजा केली जाते, तशी शेतकऱ्यांची पूजा करायला हवी- अबु आझमी
केंद्र सरकार हट्टीपणे वागले नसते तर ही वेळ आलीच नसती- जयंत पाटील
“असा राज्यपाल पाहिला नाही, त्यांना कंगनाला भेटायला वेळ, पण शेतकऱ्यांना भेटायला नाही”