सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्यांनी…; देवेंद्र फडणवीसांची आदित्य ठाकरेंवर टीका

0
370

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : विधानसभा विरोधी पक्षनेते दवेंद्र फडणवीस यांनी बाबरी पाडली तेव्हा आपण तिथे होतो पण एकही शिवसैनिक त्या ठिकाणी नव्हता असं म्हटलं आहे. यानंतर पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंनी फडणवीसांची खिल्ली उडवली होती. त्याला आता देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

हे ही वाचा : “ज्या दिवशी माझं सरकार येईल त्यावेळी मी…; राज ठाकरेंनी शेअर केला हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा व्हिडिओ”

सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेले जे मर्सिडीज बेबी आहेत त्यांना कधी संघर्ष करावा लागला नाही आणि त्यांनी कधी संघर्ष केला आहे. त्यामुळे करसेवकांची ते थट्टा उडवू शकतात. मात्र कितीही खिल्ली उडवली तरी तेव्हा तिथे होतो याचा आम्हाला गर्व आहे. असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

दरम्यान, मी हिंदू असल्याने मागील आणि पुढील जन्मावर माझा विश्वास आहे. त्यामुळे मागील जन्म असेल तर कदाचित 1857 च्या युद्धात मी तात्या टोपे, झाशीच्या राणीसोबत लढत असेन, असंही देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

 …आणि मविआ सरकार राज ठाकरेंना तुरूंगात डांबेल- चंद्रकांत पाटील

राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झाल्यानंतर मनसेकडून पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

“मोठी बातमी! मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here