“थोरातांची कमळा’ चित्रपट गाजला, आता ‘विखे पाटलांची कमळा’ आला अन् पडला”

0
261

मुंबई : एवढे वर्ष काँग्रेससोबत होतो, मात्र सत्तेसाठी लाचार झालेले प्रदेशाध्यक्ष आपण यापूर्वी कधीच पाहिले नाहीत, असं म्हणत भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातांना टोला लगावला होता, यावर सामना’च्या अग्रलेखातून राधाकृष्ण विखे पाटील यांचा चांगलाच समाचार घेण्यात आला आहे.

फार पूर्वी ‘थोरातांची कमळा’ हा चित्रपट गाजला होता, आता ‘विखे पाटलांची कमळा’ असा चित्रपट आला अन् पडला. काँग्रेसची खाट कुरकुरते की नाही ते पाहू, पण विखेंची ‘टूर अँड ट्रॅव्हल’ कंपनी बंद पडली आहे, मात्र त्यांची टूरटूर सुरु आहे, असं ‘सामना’च्या अग्रलेखातून म्हटलं आहे.

दरम्यान, काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड मारु नयेत, हा साधा नियम विखे विसरले असतील, तर त्यांनी राजकारणातून तूर्त दूर झालेले बरे असा टोलाही ‘सामना’तून लगावला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

आशा सेविकांसाठी अमित ठाकरेंची अजित पवारांकडे ‘ही’ महत्त्वाची मागणी

“यंदाचा गणेश उत्सव कोविड-19 च्या आरोग्य विषयक काळजी घेऊन साजरा करु”

नरेंद्र मोदी हे सरेंडर मोदी आहेत; राहुल गांधीचे पंतप्रधानांवर टिकास्त्र

जितेंद्र आव्हाड यांचा नरेंद्र मोदींना टोला; म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here