मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना भाजपाकडून राज्य सरकारवर टीका केली जात आहे. करोनासंदर्भात काम करताना मंत्रिमंडळांमधील नेत्यांमध्ये विसंवाद असल्याची टीका केली होती. त्यावरून सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीस यांना उत्तर दिलं आहे.
मला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सांगायचं आहे की, ही ब्लेमगेमची वेळ नाही. आपल्याला राजकारण करायला खूप वेळ आहे. करोनाचं संकट संपल्यावर ते करू. विधानसभा निवडणुका लागल्यावर ते करू. त्यावेळी आम्ही तुम्हाला उत्तरं देऊ, असं म्हणत अशोक चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.
देशानं पाकिस्तानशी युद्ध केलं तेव्हा पूर्ण देश एकत्र होता. मोदींनी सर्जिकल स्ट्राईकचा निर्णय घेतला, तेव्हा देश एकत्र होता. हा सुद्धा एक लढा आहे. आणि एकत्रितपणे लढला पाहिजे, असं मला वाटतं, असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, आम्हालाही काही गोष्टी दिसताहेत. कोण काम करत. कोण फक्त फोटो काढून व्हायरलं करतंय. पण, आम्ही काही बोलत नाही, कारण ही वेळ नाही. आता आपला दुश्मन करोना आहे. त्याच्याशी एकत्रितपणे लढणं गरजेचं आहे. त्यासाठी सकारात्मक सूचनांचं स्वागत आहे, असंही ते म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी-
“आम्हालाही मदत करा; पाकिस्तानने भारताकडे मागितला मदतीचा हात”
वांद्र्यामधील घटना पूर्वनियोजित होती- किरीट सोमय्या
सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांना शरद पवारांनी केली ‘ही’ विनंती
“महाराष्ट्र सरकार गांभीर्याने आणि धैर्याने करोनाचा सामना करतंय”