आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : अभिनेते किरण माने यांनी एक फेसबुक पोस्ट लिहिली, त्यानंतर त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केलं गेलं आणी ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून किरण माने यांना काढून टाकण्यात आलं. ही फेसबुक पोस्ट लिहिल्याने आपल्याला मालिकेतून काढलं गेलं, असा आरोप किरण माने यांचा आहे. त्यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच मनसेनेही प्रतिक्रिया दिली आहे.
मनसेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी मला या प्रकरणावर काही बोलायचं नाही, किरण माने यांनीच मालिकेतील इतर कलाकारांना त्रास दिला. योग्य वेळी याबाबत आम्ही भुमिका घेऊ, असं सांगितलं. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.
हे ही वाचा : “राष्ट्रवादीचा भाजपला दणका, अनेक पदाधिकाऱ्यांनी हाती बांधलं घड्याळ”
दरम्यान, ‘मला यावर काहीही बोलायचं नाही. किरण माने यांनी मालिकेतील इतर सहकलाकारांना त्रास दिलाय. त्यांच्या वर्तणुकीमुळे त्यांना मालिकेतून काढण्यात आलं.’ किरण यांचा आरोप आहे की, ‘मी राजकीय भूमिका घेतल्याने मला कुठलीही पूर्वकल्पना न देता मालिकेतून बाहेर केलं गेलं.’ यावर ‘कावळा बसायला आणि फांदी तुटायला एकच वेळ झाली. राजकीय भूमिकेमुळे नव्हे तर त्यांच्या वर्तणुकीमुळे त्यांना मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. या सगळ्यावर योग्यवेळी मनसे आपली भुमिका मांडेल, असं खोपकर म्हणाले आहेत.
महत्वाच्या घडामोडी –
अजित पवारांकडून आदित्य ठाकरेंचा उल्लेख मुख्यमंत्री, नंतर केला खुलासा, म्हणाले…