कोलकाता : 2020 मध्ये होणाऱ्या IPLच्या 13व्या हंगामासाठीचा लिलावाला कोलकाता येथे सुरवात झाली आहे.
ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर पॅट कमिन्स हा आयपीएल इतिहासातला दुसरा सगळ्यात महागडा खेळाडू ठरला. बंगळुरु, दिल्ली आणि कोलकाता यांच्यात पॅट कमिन्सवरुन स्पर्धा रंगली. अखेर कमिन्स 15.50 कोटी रुपयांना कोलकात्याला विकला गेला. तर ग्लेन मॅक्सवेलला विकत घेण्यावरुन पंजाब आणि दिल्ली यांच्यात जोरदार बोली लागली
आयपीएल इतिहासात युवराज सिंगवर सर्वाधिक बोली लागली होती. 2015 साली दिल्लीने युवराजला 16 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं.
खेळाडू आणि संघ
पॅट कमिन्स- 15.50 कोटी कोलकाता
क्रिस मॉरिस- 10 कोटी रुपये- बंगळुरू
ग्लेन मॅक्सवेल- 10.75 कोटी रुपये- पंजाब
एरॉन फिंच- 4.40 कोटी रुपये- बंगळुरू
जेसन रॉय-1.50 कोटी रुपये- दिल्ली
रॉबिन उथप्पा- 3 कोटी रुपये- राजस्थान
इयन मॉर्गन- 5.25 कोटी रुपये- कोलकाता
क्रिस लिन- 2 कोटी रुपये- मुंबई
दरम्यान, आयपीएलमध्ये खेळण्यासाठी यावेळी 997 खेळाडूंना अर्ज केले होते. त्यापैकी फक्त 332 खेळाडूंना शॉटलिस्ट करण्यात आले होते.या 332 पैकी 73 खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळता येणार आहे. यंदा लिलावामध्ये पंजाब संघाकडे सर्वाधिक 42.70 कोटी तर मुंबई संघाकडे सर्वात कमी म्हणजे 13.05 कोटी इतकी रक्कम आहे.
संघ | रक्कम | खेळाडूंची जागा |
चेन्नई | 14.60 कोटी रुपये | 5(2 परदेशी) |
दिल्ली | 27.85 कोटी रुपये | 11 (5 परदेशी) |
पंजाब | 42.70 कोटी रुपये | 9 (4 परदेशी) |
कोलकाता | 35.65 कोटी रुपये | 11(4 परदेशी) |
मुंबई | 13.05 कोटी रुपये | 7 (2 परदेशी) |
राजस्थान | 28.90 कोटी रुपये | 11 (4 परदेशी) |
बंगळुरू | 27.90 कोटी रुपये | 12(6 परदेशी) |
हैदराबाद | 17कोटी रुपये | 7 (2 परदेशी) |
महत्वाच्या घडामोडी-
-माझ्या महाराष्ट्रात माता आणि बाजूला जाऊन खाता? मुख्यमंत्र्यांचा भाजपवर निशाना
-मनसेच्या ‘या’ एकमेव आमदाराच्या गाडीचा आपघात
-ऑनलाईन व्यवहार करणाऱ्यांनो सावधान.. अशी होते OTP फसवणूक
-भारताकडून वेस्ट इंडिजचा धुव्वा, मालिकेत 1-1 ची बरोबरी