‘दीड फूट’ उंची असणाऱ्या या पोपटाचा जन्मच ‘शिमग्याला’ झालाय; मेहबूब शेख यांचा निलेश राणेंवर हल्लाबोल

0
731

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत यांचा विवाह सोहळा पार पडला. या विवाहाच्या निमित्ताने नुकताच संगीत सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत डान्स करतानाचा व्हिडिओ सोशल मिडियात जोरदार व्हायरल झाला होता. यानंतर सुप्रिया सुळेंवर मोठ्या प्रमाणात टीका झाली. भाजप नेते निलेश राणे यांनीही सुप्रिया सुळेंवर टीका केली होती.

हे ही वाचा : आगामी महापालिका निवडणुका आम्हीच जिंकणार; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास

दारूवरची एक्साईज ड्युटी कमी करण्याचे कारण आता समजले . शेतकरी कामगार देशोधडीला लागले आणि ठाकरे सरकारचे प्रमुख नेते डान्स करत आहेत. दोन वर्षात महाराष्ट्राचे वाटोळं करणारे सरकार कसे जनतेच्या छातीवर नाचते. याचे उदाहरण आहे हे, अशा शब्दात निलेश राणेंनी सुप्रिया सुळेंवर टीका केली होती. यावरून आता राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख यांनी प्रतिक्रिया देत राणेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.

वैचारिक दृष्ट्या ‘दीड फूट’ उंची असणाऱ्या या पोपटाचा जन्मच ‘शिमग्याला’ झालेला आहे वाटतं. कोणाच्याही बद्दल दोन्ही हातांनी बोंबलत बसण्या पलीकडे काही कर्तृत्व नाही., असं ट्विट करत मेहबूब शेख यांनी निलेश राणेंवर हल्लाबोल केला.

महत्वाच्या घडामोडी –

संजय राऊतांसोबत केलेल्या डान्सवर टीका करणाऱ्यांना सुप्रिया सुळेंनी दिलं जोरदार उत्तर; म्हणाल्या…

ममता बॅनर्जी आजपासून 3 दिवस मुंबई दाैऱ्यावर, शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची घेणार भेट; चर्चांना उधाण

गिरीश महाजन म्हणाले, शिवसेनेसोबतचा आमचा 25 वर्षांचा संसार तोडला, आता जयंत पाटील म्हणतात…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here