” ही महाविकास आघाडी नव्हे, ही तर ‘महाविनाश’ आघाडी”

0
376

मुंबई : राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी ही राज्यासाठी महाविनाश आघाडी ठरली आहे, असं वक्तव्य भाजपाचे महाराष्ट्राचे प्रभारी सी.टी. रवि यांनी केलं आहे. भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीच्या उद्घाटन सत्रात ते बोलत होते.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यात भ्रष्टाचार साथीसारखा वाढत आहे, हे दुर्दैव आहे. राज्यात भ्रष्टाचाराचे तांडव चालू आहे. मंत्र्यांची अनेक प्रकरणे उघड झाली. दोन जणांना राजीनामा द्यावा लागला. महाराष्ट्राला लुटणे एवढे एकच काम चालू आहे, असं सी. टी. रवि म्हणाले आहेत.

ही आघाडी राज्याला विनाशाकडे नेत आहे. लुटा आणि वाटून खा एवढाच त्यांचा एक कलमी किमान-समान कार्यक्रम आहे. परंतु, भाजपा या आघाडीचे लुटीचे स्वप्न पूर्ण होऊ देणार नाही, असं सी. टी. रवि यांनी म्हटलंय.

महत्वाच्या घडामोडी –

तुमच्यात हिंमत नसेल तर आम्हांला सांगा, चार महिन्यात आरक्षण देतो- देवेंद्र फडणवीस

“भाजपला ओबीसींचा कळवळा कधीपासून यायला लागला?

काँग्रेसचा स्वबळाचा आग्रह शेवट पर्यंत टिकेल असं वाटत नाही- जयंत पाटील

मंत्री झाले राजे आणि प्रत्येक विभागात एक-एक वाझे- देवेंद्र फडणवीस

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here