मुंबई : जालन्यात अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला. चार जणांच्या टोळक्याने एका प्रेमी युगलाला मारहाण केली. संबंधित मुलीचा विनयभंग करत व्हिडीओ बनवला. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. यावर सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग मंत्री धनंजय मुंडे यांनी निषेध व्यक्त केला आहे.
एबीपी माझा या वाहिनीने दिलेल्या बातमीनुसार जालन्यात चार जणांच्या टोळक्याने एका प्रेमीयुगुलाला बेदम मारहाण करून तरुणीचा विनयभंग केला. या टोळक्याने प्रेमीयुगुलाला मारहाण करतानाचा व्हिडीओही बनवला. हा संतापजनक आणि घृणास्पद प्रकार आहे. मी या घटनेचा निषेध करतो, असं ट्वीट धनंजय मुंडे यांनी केलं आहे.
एबीपी माझा या वाहिनीने दिलेल्या बातमीनुसार जालन्यात चार जणांच्या टोळक्याने एका प्रेमीयुगुलाला बेदम मारहाण करून तरुणीचा विनयभंग केला. या टोळक्याने प्रेमीयुगुलाला मारहाण करतानाचा व्हिडीओही बनवला. हा संतापजनक आणि घृणास्पद प्रकार आहे. मी या घटनेचा निषेध करतो.@abpmajhatv
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) January 31, 2020
पुरोगामी महाराष्ट्रात असा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. राज्याचे गृहराज्य मंत्री शंभूराजे देसाई यांनी जालना पोलिसांना तात्काळ कारवाईचे आदेश दिले आहे. जालना पोलीस यावर जलद कारवाई करत आरोपींना अटक करतील, असंही ते म्हणाले.
पुरोगामी महाराष्ट्रात असा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. राज्याचे गृहराज्य मंत्री शंभूराजे देसाई यांनी जालना पोलिसांना तात्काळ कारवाईचे आदेश दिले आहे. जालना पोलीस यावर जलद कारवाई करत आरोपींना अटक करतील.@shambhurajdesai @abpmajhatv
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) January 31, 2020
महत्वाच्या घडामोडी-
…म्हणून आंबेडकर स्वीकारायचं की गोळवलकर हे देशानं ठरवावं
महाराष्ट्राचं पाणी हे गुजरातला जाता कामा नये- उद्धव ठाकरे
गांधींना मारणारा हिंदूच होता; उर्मिला मातोंडकरांचा हिंदुत्ववादी संघटनेवर निशाणा
माझ्या मुलाने बाबरी मशिदीबाबत केलेल्या वक्तव्याचा मी निषेध करतो- अबू आझमी