Home पुणे “हे जे काही शिवसेनेत चाललं आहे त्याच्याशी…”; चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

“हे जे काही शिवसेनेत चाललं आहे त्याच्याशी…”; चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्याने मागील दोन दिवसांपासून महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच फेसबूक लाइव्हद्वारे आपली भूमिका मांडली आहे. आपण अयोग्य आहोत हे बंडखोर आमदारांनी समोर येऊन सांगावं आपण लगेच राजीनामा देऊ, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. यानंतर मुख्यमंत्र्यांच्या या भाषणावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील प्रतिक्रिया दिली आहे.

हे ही  वाचा : उद्धव ठाकरेंच्या भाषणानंतर एकनाथ शिंदेंनी व्यक्त केली खदखद, म्हणाले…

“ते, त्यांचं मनोगत आहे. यावर माझं नो कॉमेंट. मी काहीही बोलू शकत नाही,” असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. चंद्रकांत पाटील यांनी पुण्यामध्ये पत्राकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.

दरम्यान, “हे जे काही शिवसेनेत चाललं आहे त्याच्याशी भाजपाचा काहीही संबंध नाही,” असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी – 

एकनाथ शिंदेंचीच शिवसेना, खरी शिवसेना- रामदास आठवले

पत्नी रश्मी, मुलांसह उद्धव ठाकरेंनी वर्षा बंगला सोडला, शिवसैनिकांची मोठी गर्दी, शंखनाद, फुलांचा वर्षाव

शिवसेना नेते आणि आमदारांची बंडखोरी हे सर्व भाजपचे षडयंत्र; सुरतहून परतलेल्या नितीन देशमुख यांचा आरोप