मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं मातोश्री निवासस्थान उडवून देण्याची धमकी दाऊद इब्राहिमच्या हस्तकानं केल्याची माहिती समोर आली आहे. यावरुन उलट दाऊद म्हणत असेल हाच मुख्यमंत्री पाहिजे, असं म्हणत भाजप नेते निलेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे.
दाऊद कडून उद्धव ठाकरेंना धमकीचा फोन. मंत्र्यांचे फोन उचलत नाही अन दाऊदचा लगेच उचलला?, असं ट्विट करत निलेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
आता नवीन नाटक.. अपयश आणि अपराध लपवण्याचा अजून एक प्रकार. आज मातोश्री मध्ये राहणाऱ्या एका ही व्यक्ती वर एकही केस नाही आणि ना ह्यांची दाऊदच्या विरोधात मोहीम, मग धमकी का येईल?, असा सवाल करत, मग सांगणार आंगवर आले आम्ही उडवून दिले पण खरं कोणही आलेलाच नसतो. उलट दाऊद म्हणत असेल हाच मुख्यमंत्री पाहिजे, असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे.
आता नवीन नाटक.. अपयश आणि अपराध लपवण्याचा अजून एक प्रकार. आज मातोश्री मध्ये राहणाऱ्या एका ही व्यक्ती वर एकही केस नाही आणि ना ह्यांची दाऊदच्या विरोधात मोहीम, मग धमकी का येईल? मग सांगणार आंगवर आले आम्ही उडवून दिले पण खरं कोणही आलेलाच नसतो. उलट दाऊद म्हणत असेल हाच मुख्यमंत्री पाहिजे. https://t.co/DpuOMe16GG
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) September 6, 2020
दाऊद कडून उद्धव ठाकरेंना धमकीचा फोन…
मंत्र्यांचे फोन उचलत नाही अन दाऊदचा लगेच उचलला?
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) September 6, 2020
महत्वाच्या घडामोडी-
“मुख्यमंत्र्यांना धमकीचा फोन; मातोश्री उडवून देण्याची दिली धमकी”
घाबरु नका, कोरोना संपल्यावर आपलीच सत्ता येईल; रावसाहेब दानवे पाटलांचं वक्तव्य
कोरोनाविरोधात एकत्र येऊया; चंद्रकांत पाटलांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र
पुण्यातील लॉकडाऊन व्यापाऱ्यांच्या दबावामुळे हटवला- अजित पवार