मुंबई : येत्या सोमवारी म्हणजेच पाडव्यापासून राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं आहे
हा फक्त सरकारी आदेश नसून ‘श्रीं ची इच्छा समजा. मंदिरात चपला बाहेर काढून प्रवेश करायचा असतो, पण तोंडावरील मास्क मात्र सक्तीचा आहे हे विसरू नका, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
मंदिरे उघडतील, इतर प्रार्थनास्थळे उघडतील. आपण शिस्त पाळली तरच देवांचे आशीर्वाद आपल्याला व महाराष्ट्राला मिळतील, असे भावनिक आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं आहे.
दरम्यान, अनलॉकची प्रक्रिया सुरू असली तरी राज्यातील मंदिरं मात्र उघडण्यास परवानगी देण्यात आली नव्हती. अनलॉकमध्ये बहुतेक सर्वच बाबी सुरु झाल्याने राज्यातील मंदिरंही खुली करावीत अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती. याची दखल घेत अखेर ठाकरे सरकारने दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर सर्व धार्मिक स्थळं उघडण्याचा निर्णय घेतला आहे.
महत्वाच्या घडामोडी-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा स्वभाव लय भारी- अशोक चव्हाण
मुंबई महानगरपालिकेवर भाजपचाच झेंडा फडकणार- प्रवीण दरेकर
“लवकरच ट्रेलर रिलीज करू, मनात आणलं तर भाजप रिकामी होईल”