Home महाराष्ट्र ‘हे’ तर राज्य सरकारचं तुघलकी फर्मान; वीजपुरवठा खंडीत करण्याच्या निर्णयावरुन भाजपची टीका

‘हे’ तर राज्य सरकारचं तुघलकी फर्मान; वीजपुरवठा खंडीत करण्याच्या निर्णयावरुन भाजपची टीका

मुंबई : राज्यात लॉकडाऊन काळात वाढीव दराने वीज बिल आकारल्यावरुन विरोधकांनी राज्य सरकारवर टीका केली होती. आता महावितरण’ने थकीत वीजबिल वसुलीचे आदेश जाहीर केले आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजपाचे महाराष्ट्र मीडिया प्रमुख आणि ‘महावितरण’चे माजी संचालक विश्वास पाठक यांनी राज्यसरकारवर निशाणा साधला आहे.

पैसे भरले नाहीत तर वीज पुरवठा खंडित करू हे ऊर्जामंत्र्यांचे फर्मान तुघलकी आहे. याचा आम्ही निषेध करतो. महाराष्ट्राचा वीज ग्राहक अतिशय प्रामाणिक आहे. तो अडचणीत असल्यामुळे राज्य सरकारकडून मदतीची अपेक्षा करतो आहे, असं विश्वास पाठक म्हणाले.

करोनाकाळाआधीची महावितरणची थकबाकी त्यांनी पूर्ण केली आहे. ग्राहक प्रामाणिकपणे वीज बिल भरणा करत आहेत. पण करोनाकाळात अव्वाच्या सव्वा चुकीची बिलं देण्यात आली असून त्यात सूट देण्याच्या नुसत्या घोषणा करण्यात आल्या, असं विश्वास पाठक यांनी यावेळी सांगितलं.

सरकारने ग्रामपंचायत निवडणुकांपर्यंत वाट पाहिली आणि निकालानंतर लगेच त्यांनी तुघलकी निर्णय घेतला. याचा भाजपा निषेध करत आहे, असं मत विश्वास पाठक यांनी यावेळी मांडलं.

महत्वाच्या घडामोडी-

ठाकरे सरकार फक्त टक्केवारीत नंबर वन; अतुल भातखळकरांचा टोला

“दाक्षिणात्य तेलगु अभिनेत्री दक्षी गुट्टीकोंडाच्या हाॅट फोटोंनी सोशल मिडियावर लावलीय आग”

‘या’ तारखेपासून अण्णा हजारे करणार राळेगणसिद्धीत उपोषण

“शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव किती ठिकाणी द्यायचं याचा निर्णय घ्या”