मुंबई : दिल्लीमधील जेएनयू विद्यापीठात हिंसाचाराच्या घटनेनंतर मुंबईतील ‘गेट वे ऑफ इंडिया’वर आंदोलन करत ‘स्वतंत्र काश्मीर’ची (Free Kashmir) मागणी करणारे पोस्टर झळकावण्यात आले. यात काश्मीरबद्दलचा तो फलक हातात घेऊन उभी असणाऱ्या महेक मिर्झा प्रभू या तरूणीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती.
मुंबई पोलिसांनी या तरूणीच्या विरोधातील मागे घेतली. यावरुन भाजप नेते अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर निशाणा साधलाय.
“वर्षभरापूर्वी मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियावर जेएनयुतील तुकडे गँगच्या समर्थनार्थ निदर्शने करणाऱ्या ज्या निदर्शकांच्या हातात ‘काश्मीर मुक्त करा’चे फलक होते, त्यांच्या विरुद्धची तक्रार मागे घेऊन ठाकरे सरकारने तुकडे गँगची पाठराखण केली आहे. हाच आहे शिवसेनेचा खरा चेहरा, असं अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे.
वर्षभरापूर्वी मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया वर जेएनयुतील तुकडे गॅंगच्या समर्थनार्थ निदर्शने करणाऱ्या ज्या निदर्शकांच्या हातात “काश्मीर मुक्त करा” चे फलक होते त्यांच्या विरुद्धची तक्रार मागे घेऊन ठाकरे सरकारने तुकडे गँगची पाठराखण केली आहे. हाच आहे शिवसेनेचा खरा चेहरा. pic.twitter.com/o3LlPB7Wi5
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) December 29, 2020
महत्वाच्या घडामोडी-
संजय राऊत नोटीसला घाबरत नाही तर त्यांनी ईडीला हिशोब द्यावा- रामदास आठवले
“तुम लाख कोशिश करलो मुझे बदनाम करने की…;”- संजय राऊत
गुजरातमध्ये भाजपला मोठा धक्का; ‘या’ खासदाराने पक्षाला दिली सोडचिठ्ठी
“राऊत कुटुंबाच्या ‘मनी ट्रेल, कॅश ट्रेल’ची चौकशी करा”