Home महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील जनतेला दिली दिलासा देणारी ‘ही’ मोठी बातमी

मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील जनतेला दिली दिलासा देणारी ‘ही’ मोठी बातमी

मुंबई : सध्या संपूर्ण जग करोना व्हायरसच्या संकटाचा सामना करत आहे. भारतातही या विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी अनेक उपायोजना करण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेसाठी एक सकारात्कम आणि दिलासा देणारी घोषणा केली आहे.

राज्यातील 52 करोनाग्रस्त रुग्णांपैकी पाच जण विषाणूमुक्त झाले आहेत. असं उद्धव ठाकरेंनी जाहीर केलं आहे. ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.

एक समाधानाची गोष्ट अशी आहे की राज्यामधील ज्या 52 करोनाग्रस्त रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यापैकी पाच रुग्ण विषाणूमुक्त झाले आहेत. आपण जे इलाज करत आहोत, उपचार करत आहोत त्याचा सकारात्मक परिणा दिसून येत आहे. पाच रुग्ण विषाणूमुक्त असले तरी त्यानंतरही त्यांना 14 दिवस देखरेखी खाली ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याने कोणालाही डिसचार्ज देण्यात आलेला नाही, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

कोरोनाविरोधात एकत्र न येता सोशल मीडियातून एकत्र येऊ म्हणत रोहित पवारांनी शेअर केलं मॅशअप साँग

निर्भया प्रकरण; रितेश देशमुखने ट्विटवरुन केल्या भावना व्यक्त

अखेर न्याय मिळाला; चारही दोषींना फासावर लटकवण्यात आलं

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असते तर आज गावोगावी तिरड्या उठल्या असत्या; राष्ट्रवादीचा फडणवीसांना टोला