मुंबई : हिंदी चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यपनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेबद्दल भूमिका मांडली आहे. यावरुन भाजप नेते निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
“उद्धव ठाकरेंमुळे शिवसेनेबाबतची मतं बदलली? म्हणजे बाळासाहेबाच्या शिवसेनेबाबत अनुराग कश्यपची मतं वेगळी होती? ही सरळ सरळ बाळासाहेबांची बदनामी आहे, असं म्हणत हे सगळं बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनी निमुटपणे ऐकून घ्यायचं…,” असंही निलेश राणे म्हणाले.
उद्धव ठाकरेंमुळे शिवसेनेबाबतची मतं बदलली? म्हणजे बाळासाहेबांच्या शिवसेनेबाबत अनुराग कश्यपची मतं वेगळी होती? ही सरळ सरळ बाळासाहेबांची बदनामी आहे.
हे सगळं बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनी निमुटपणे ऐकून घ्यायचं…. pic.twitter.com/as6mWsRcSK
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) September 19, 2020
दरम्यान, अनुराग कश्यपनं आपल्याला महाराष्ट्रात सुरक्षित वाटतं. उद्धव ठाकरे यांच्यामुळे माझी शिवसेनेबद्दलची मतंही बदलली, असं मत व्यक्त केलं होतं.
महत्वाच्या घडामोडी-
“दिल्ली कॅपिटल्सचे किंग्स इलेव्हन पंजाबसमोर 158 धावांचे लक्ष्य”
सरकार पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना अटक करा, त्यांची नावे जाहीर करा- प्रकाश आंबेडकर
ऑडिट बिलांचेच नव्हे तर डॉक्टरांचेही करण्याची गरज- जयंत पाटील
“अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना जीवे मारण्याचा प्रयत्न”