मुंबई : औरंगाबादचं नाव बदलून संभाजीनगर करण्याचा शिवसेनेचा जुना अजेंडा आहे. मात्र काँग्रेसने याला स्पष्टपणे नकार दिला आहे. यावर भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रतिक्रिया दिली. मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
सत्तेत असूनही शिवसेना औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर असे करण्यासाठी काहीही प्रयत्न करत नाही. ज्याप्रमाणे औरंगजेबांनी त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना भेटायला बोलावून विश्वासघाताने त्यांना अटक केली, त्या औरंगजेबाप्रमाणे सध्याच्या शिवसेनेचं वर्तन आहे., असं म्हणत केशव उपाध्ये यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे.
दरम्यान, शिवसेनेची बोलण्याची भाषा वेगळी असते. प्रत्यक्ष कृती करण्याची वेळ येते, तेव्हा मात्र शिवसेना वेगळी भाषा वापरते. ते कसब आता शिवसेनेनं अवगत करून घेतले आहे. म्हणूनच आता ही बाळासाहेबांची शिवसेना राहिली नसून ती औरंगजेबसेना झाली आहे असे म्हणावे लागत आहे, अशी टीका केशव उपाध्ये यांनी यावेळी केली.
महत्वाच्या घडामोडी-
“किंगफिशरच्या कॅलेंडरसाठी एकापेक्षा एक हाॅट माॅडेल्सचे फोटोशूट”
“कोरोनानंतर ‘या’ राज्यात आता बर्ड फ्लूचे थैमान”
“सरपंचपदाची बोली बोलायची व बोलीतून निवडून यायचं हा लोकशाहीचा खून”
“शिवसेनेकडून नितीन गडकरी यांचं काैतुक”