‘हा’ महाविकास आघाडीतील अंतर्गत प्रश्न; सुप्रिया सुळेंचं वक्तव्य

0
189

पुणे : बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत मंगळवारी पुण्यात मराठी लोकप्रिय अभिनेत्री आणि दिग्दर्शिका प्रिया बेर्डे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी त्यांना अहमदनगरमधील शिवसेनेच्या पाच नगरसेवकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रवेशावरून प्रश्न विचारला. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.

काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र या पाच नगरसेवकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रवेश हा महाविकास आघाडीतील अंतर्गत प्रश्न आहे. असं सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलंय.

दरम्यान,सध्या जगावर कोरोनाच संकट असून आपल्या राज्यावर देखील संकट आहे. या काळात राज्य सरकार चांगले काम करत आहे. मात्र विरोधक टीका करण्याचं काम करत असून त्यांनी त्यांचे काम करावं. आम्ही आमचे काम करतच राहणार आहोत. मात्र आमचं सरकार दडपशाहीचं नाही, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

महत्वाच्या घडामोडी-

मातोश्रीवर जाण्यात कमीपणा काय?; शरद पवारांचं चंद्रकांत पाटलांना उत्तर

भाजप आणि शिवसेनेचं सरकार असतानाही खटके उडत होते; संजय राऊतांच फडणवीसांना उत्तर

देवेंद्र फडणवीस यांना वाटते तशी परिस्थिती नाही- रोहित पवार

“महसूलमंत्री बाळासाहेब थोरात होम क्वारंटाईन”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here