Home महाराष्ट्र “भंडारा घटनेवर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सरकारकडे केली ‘ही’ महत्त्वाची मागणी”

“भंडारा घटनेवर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सरकारकडे केली ‘ही’ महत्त्वाची मागणी”

मुंबई : भंडाऱ्यातील जिल्हा रुग्णालयात मध्यरात्रीच्या सुमारास शिशु केअर युनिटला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. यात 10 बालकांचा मृत्यू झाला. यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

भंडारा जिल्हा रुग्णालयातील आगीत १० बालकांचा मृत्यू झाल्याची घटना कळताच मन सुन्न झाले ही घटना अतिशय वेदनादायी आणि मनाला व्यथित करणारी आहे या सर्व कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत या घटनेची तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी, असं ट्विट करत चित्रा वाघ यांनी सरकारकडे ही मागणी केली आहे. 

भंडारा जिल्हा रुग्णालयातील आगीत १० बालकांचा मृत्यू झाल्याची घटना कळताच मन सुन्न झाले भविष्यात अशी हानी पुन्हा होऊ नये म्हणून प्रत्येक सरकारी हॉस्पिटलमध्ये अग्निशमन यंत्र fire extinguisher पाहिजे आणि ते कसे वापरावे याचं प्रशिक्षण तिथल्या nursing व इतर staff ला दिले गेले पाहिजे, असंही चित्रा वाघ म्हणाल्या.

महत्वाच्या घडामोडी-

“अशोक चव्हाण यांचं मराठा आरक्षणासंदर्भातील वक्तव्य हे अज्ञान आहे”

मुख्यमंत्र्यांनी ‘त्या 19 मालमत्तां’ची माहिती लपवली; किरीट सोमय्यांचा आरोप

भंडारा घटनेची योग्य चाैकशी करून सरकार दोषींवर कारवाई करेल, असा विश्वास आहे; रोहित पवारांकडून श्रद्धांजली अर्पण

भंडारा येथील जिल्हा रूग्णालयाला आग; 10 बालकांचा आगीत जळून मृत्यू