पुणे : उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनीआज बारामतीमध्ये जाऊन, पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी अजित पवारांनी नद्यांसह ओढ्याभोवतीची अतिक्रमणे काढण्याचे आदेश दिले. यावेळी बोलताना “नदी-ओढ्याभोवतीची अतिक्रमणं तातडीने हटवा. माझं- अजित पवारांचे अतिक्रमण असेल तरी मुलाहिजा बाळगू नका, असं अजित पवार म्हणाले.
पूरस्थिती टाळण्यासाठी नद्यांचे खोलीकरण करण्यासह नदी आणि ओढ्यांच्या परिसरातील अतिक्रमणे काढण्याची सूचना करत नदी अथवा ओढ्यावर अजित पवारांचे अतिक्रमण असले तरी ते काढून टाका, कुणाचाही मुलाहिजा बाळगू नका असा स्पष्ट आदेश अजित पवार यांनी यावेळी दिला.
दरम्यान, नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीदरम्यान अजित पवार यांनी ठिकठिकाणी ग्रामस्थांशी संवाद साधत अधिकारी वर्गालाही सूचना दिल्या.
महत्वाच्या घडामोडी-
दसऱ्यापासून राज्यभरात जिम, व्यायामशाळा सुरू होणार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
अंबाती रायडू व फाफ ड्यू प्लसिसची शानदार फलंदाजी; चेन्नईचे दिल्लीसमोर 180 धावांचे लक्ष्य
घराबाहेर पडल्यावर एकट्या मुख्यमंत्र्यांनाच कोरोना होतो का?; रावसाहेब दानवेंचा सवाल
मिस्टर 360 ए.बी.डिव्हीलियर्सचे नाबाद अर्धशतक; आरसीबीची राजस्थानवर 7 विकेट्सनी मात