‘ही’ बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेसाठी लाजिरवाणी गोष्ट आहे- चंद्रकांत पाटील

0
633

मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाने आता वेगळं वळण मिळालं आहे. तिच्या आत्महत्या प्रकरणाशी संबंधित काही ऑडिओ क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिाया दिली आहे.

पूजा चव्हाण प्रकरणातही जर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजींनी कारवाई केली नाही तर महिलांचा राज्य सरकारवरचा विश्वास उडेल, अस  चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

पोलिसांवर हल्ला करणारे मंत्री तुमचे. कार्यकर्त्यांना घरी नेऊन मारहाण करणारे मंत्री तुमचे. 15 वर्षापासून एका महिलेसोबत शारिरीक संबंध ठेवणारे मंत्री तुमचे. आता काय राहिलं. त्यात भर म्हणून पूजा चव्हाण प्रकरणात देखील शिवसेनेच्या मंत्र्याचे नाव समोर येणं ही बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेसाठी लाजिरवाणी गोष्ट आहे, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

महत्वाच्या घडामोडी 

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरुन तृप्ती देसाई आक्रमक; ठाकरे सरकारवर केले ‘हे’ गंभीर आरोप

पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी अजित पवारांच मोठं वक्तव्य; म्हणाले…

साताऱ्यात कॉलेज तरुणींची तुफान हाणामारी; व्हिडीओ होतोय व्हायरल

मुख्यमंत्री महोदय, एवढे पुरावे असतांना वाट कसली पाहताय?; चित्रा वाघ यांचा सवाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here