“मिरच्या झोंबल्या, बांबू लागला, म्हणूनच मुख्यमंत्र्यांच्या प्रत्येक शब्दावर खुलासा करावा लागला ना?”

0
488

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरे यांनी काल भाष्य करताना विरोधी पक्षावर जोरदार हल्लाबोल केला. यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्र्यांच्या कालच्या भाषणात काहीच नव्हतं, असं म्हणत टोला लगावला. यावरून आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांवर निशाणा साधला.

मिरच्या झोंबल्या, ठसका लागला, बांबू लागला म्हणूनच मुख्यमंत्र्यांच्या प्रत्येक शब्दावर खुलासा करावा लागला ना? नाही तर एवढी मोठी पत्रकार परिषद कशाला घेतली असती?, असं म्हणत राऊतांनी फडणवीसांना धारेवर धरलं. ते माध्यमांशी बोलत होते.

हे ही वाचा : “रूपाली पाटील ठोंबरे यांच्यावर राष्ट्रवादीने सोपविली ‘ही’ मोठी जबाबदारी”

मुख्यमंत्र्यांच्या भाषणात काहीच नव्हते असं म्हणता तर मग एवढी मोठी पत्रकार परिषद घेऊन वेळ का खाताय? तुम्हाला मिरच्या झोंबल्या, ठसका लागला, बांबू लागला. सगळं काही लागलं. त्यानंतर तुम्हाला त्यांच्या प्रत्येक शब्दावर खुलासा करावा लागला. याचा अर्थ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं भाषण सुपरहिट, दणदणीत, खणखणीत आणि सणसणीत झालं आहे. त्यामुळे आपण सर्व अस्वस्थ आहात, अशा प्रतिटोला राऊतांनी यावेळी फडणवीसांना लगावला.

महत्वाच्या घडामोडी –

शरद पवारांना कोरोणाची लागण; पंतप्रधान मोदींकडून प्रकृतीची विचारपूस, शरद पवारांनी मानले आभार

“…त्यामुळे शिवसेनेने भूमिका घेतली आणि भाजपाला बाजूला केलं”

राष्ट्रवादीत पक्षप्रवेशाचं वादळ; अनेक पदाधिकाऱ्यांनी हाती बांधलं घड्याळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here