राष्ट्रवादीच्या या मोठ्या नेत्याने घेतली अमित शहांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

0
516

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

नवी दिल्ली : शिरूर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची नुकतीच भेट घेतली आहे. या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

अमोल कोल्हे यांचा ‘शिवप्रताप गरुडझेप’ हा चित्रपट येत्या 5 ऑक्टोबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतली. भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

हे ही वाचा :शिवसेनेचा भाजपाला मोठा धक्का; भाजप युवा मोर्च्याच्या पदाधिकाऱ्यांसह असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

“सीबीएसईच्या पुस्तकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सविस्तर स्वरूपात नसल्यामुळे आपण खंत व्यक्त करतो. त्या पूर्ण होण्यासाठी प्रभावशाली नेत्यांचे पाठबळ मिळाले तर त्या नक्कीच पूर्ण होण्यासाठी मदत होऊ शकते. छत्रपती शिवरायांचा जाज्वल्य इतिहास देशपातळीवर आणखी अधोरेखित होण्यासाठी चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग दिल्लीत घ्यावे, अशी माझी इच्छा आहे. त्यासाठी अमित शहांनी वेळ देण्याकरिता ही भेट आहे.” असं अमोल कोल्हे यांनी यावेळी सांगितलं आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

मोठी बातमी! राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत शिवसेना सहभागी होणार?; नाना पटोलेंनी दिलं महत्वाचं उत्तर, म्हणाले…

उद्धव ठाकरेंचा वंचित आघाडीला मोठा धक्का; ‘हा’ मोठा नेता करणार शिवसेनेत प्रवेश

उद्धव ठाकरेंचा वंचित आघाडीला मोठा धक्का; ‘हा’ मोठा नेता करणार शिवसेनेत प्रवेश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here