आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलं आहे. या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं. आणि एकनाथ शिंदे यांचं सरकार स्थापन झालं. आता शिंदे सरकारविरोधात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी शिंदे सरकारसंदर्भात मोठे भाकीत केले आहे.
हे ही वाचा : ‘…याचं भान सर्व राजकीय नेत्यांनी बाळगायला हवं’; अमित ठाकरेंची शिंदे सरकारवर टीका
आषाढी एकादशी दिवशी विठूरायाच्या महापूजेनंतर दुसऱ्या दिवशी हे सरकार सत्तेत राहणार नाही, यंदाच्या वर्षी विठूरायाची शासकीय महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार आहेत. मात्र ही शासकीय पूजा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी या सरकारमधील काही बंडखोरांच्या अपात्रतेबाबत सुनावणी होणार आहे. त्यात या आमदारांना कोर्टाने अपात्र ठरवल्यास सर्व काही समोर येईल, असं अमोल मिटकरी म्हणाले आहेत.
दरम्यान, देवेंद्र फडणवीसांवर विठूराया का नाराज आहे, हा एक संशोधनाचा विषय आहे. कारण आषाढी एकादशीला एकनाथ शिंदे विठ्ठलाची पूजा करणार आहेत. त्यामुळे हे सरकार शिवसेनेचे आहे की भाजपाचे? असा सवाल मिटकरी यांनी उपस्थित केला आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
अमित शहांनी मला दिलेलं वचन मोडलं, अन्यथा…; उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा
शिंदे-फडणवीस सरकार किती दिवस टिकणार?; जयंत पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले…
‘लढता लढता हरलो जरी, हरल्याची मला खंत नाही…’; रुपाली चाकणकरांनी ट्विट करत केलं उद्धव ठाकरेंचं समर्थन