हे सरकार कोणत्याही क्षणी क्षणी पडेल; नारायण राणेंचा दावा

0
382

मुंबई : . हे सरकार कोणत्याही क्षणी जाईल आणि त्यांना कळणारही नाही, असं म्हणत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर हल्लाबोल केलाय.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारला लवकरच दोन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. तेव्हा हे सरकार किती दिवस टिकेल? असा सवाल पत्रकारांनी राणे यांना विचारला. यावर हे सरकार पाच वर्षे पूर्ण करेल असं वाटत नसल्याची भविष्यवाणी राणे यांनी केली आहे.

हे ही वाचा : “राष्ट्रवादीचा भाजपला दे धक्का; अलिबागमध्ये शेकडो कार्यकर्त्यांनी हाती बांधलं घड्याळ”

दरम्यान, राणेंनी यापूर्वीही ठाकरे सरकार पडणार असल्याचं भाकित केले होते. ठाकरे सरकामध्ये अनेक मंत्री भ्रष्ट आहेत. त्यांना पाच वर्ष सत्तेत राहाण्याचा अधिकार नाही आणि मंत्रीपदी बसायचाही अधिकार नाही,राज्याच्या हिताचे एकही काम या मंत्र्यांनी केले नाही, अशी टीका राणे यांनी केली आहे.

महत्वाच्या घडामोडी – 

 राज ठाकरेंचं ठरलं; आजपासून कुटुंबियांसह ‘शिवतीर्था’वर राहायला जाणार

“सांगली जिल्ह्याच्या बाहेर जागा जिंकल्या नाहीत, तुम्ही आम्हाला शहाणपणा शिकवू नका”

एकनाथ खडसेंचा भाजपला मोठा धक्का; जळगाव जिल्हा बँकेवर अखेर बिनविरोध निवड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here