हे सरकार एक-दीड महिन्यात कोसळणार; आदित्य ठाकरेंची भविष्यवाणी

0
303

सिंधुदुर्ग : महाराष्ट्र गद्दारी सहन करत नाही. तुम्ही लिहून घ्या हे सरकार एक-दीड महिन्यात कोसळणार आहे, अशी मोठी भविष्यवाणी करत शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्यातील भाजप अणि शिवसेनेतील बंडखोर शिंदे गट यांच्या सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.

सध्या दोन लोकांचं जंबो मंत्रीमंडळ आहे. कोण मुख्यमंत्री, कोण उपमुख्यमंत्री हेच कळत नाही. कुणी कुणाला बोलू देत नाही. सध्या त्यांचं लक्ष घाणेरड्या राजकारणावर आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

हे ही वाचा : …कारण पुढचा नंबर उद्धव ठाकरे व कुटूंबाचा असू शकतो; निलेश राणेंच्या ट्विटने खळबळ

मी आजोबा आणि वडिलांसोबत लहानपणापासून फिरलो, पण इतकं घाणेरडं राजकारण पाहिलं नाही, असंही आदित्य ठाकरे यांनी म्हंटलं आहे. ते सोमवारी सिंधुदुर्गमधील शिवसंवाद यात्रेदरम्यान आयोजित सभेत बोलत होते.

 

दरम्यान, यावेळी त्यांच्यासोबत खासदार विनायक राऊत, आदर्श बांदेकर व इतर अनेक नेते उपस्थित होते.

महत्त्वाच्या  घडामोडी –

“संजय राऊतांच्या अटकेवर, राहुल गांधींचं सूचक ट्विट, म्हणाले, राजा का संदेश साफ है, जो मेरा खिलाफ बोलेगा, वो…”

उद्धव ठाकरे हे भाजपसोबत युती करण्यास तयार होते, पण…; रामदास कदमांचा मोठा गाैफ्यस्फोट

संजय राऊत यांच्यानंतर आता शिवसेनेचा ‘हा’ मोठा नेता तुरूंगात जाणार; आमदार रवी राणा यांचा आरोप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here