सोलापूर : मराठा आक्रोश मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्याने मराठा आक्रोश मोर्चाचे आयोजक आणि माजी आमदार नरेंद्र पाटील ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
ब्रिटीशांनीही कधी आंदोलने दडपली नाहीत. पण हे सरकार आंदोलन दडपत आहे. हे सरकार ब्रिटीशांपेक्षाही वाईट आहे, असं म्हणत नरेंद्र पाटील यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.
राज्यात काही मूक मोर्चे निघाले. सरकारने त्यांना परवानगी दिली. पण मराठा आक्रोश मोर्चाला विरोध केला जातोय, असं सांगतानाच आमचे मोर्चे अडवले जात आहेत. आमच्या लोकांना जिल्ह्यात येऊ देत नाही. या ठिकाणी पोलिसांचा मोठा फोर्स तैनात करण्यात आला आहे. सातारा आणि सांगलीतून पोलीस मागवले आहेत. त्यामुळे मराठ्यांची ताकद किती आहे हे सरकारलाही कळून चुकलं आहे, असं नरेंद्र पाटील यांनी म्हटंल आहे.
दरम्यान, मराठा आक्रोश मोर्चासाठी आम्ही परवानगी मागितली. पण परवानगी नाकारण्यात आली. आज सांगून मोर्चा काढला तर एवढी यंत्रणा उभी केली. उद्या न सांगता मोर्चा काढला जाईल. मग पाहू पुढे काय होते ते, असंही नरेंद्र पाटील म्हणाले आहेत.
महत्वाच्या घडामोडी –
शिवसेनेसोबत आमचं कोणतंही शत्रूत्व नाही, परिस्थितीनुसार निर्णय घेऊ- देवेंद्र फडणवीस
“स्वप्निल लोणकरच्या आत्महत्येला सरकारचा बेफिकिरपणा जबाबदार”
‘गोपीचंद पडळकरांचं अंग माणसाचं आणि तोंड डुकराचं’; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याची जीभ घसरली
युवा पिढी निराश, लवकर परीक्षा घ्या; रोहित पवारांची राज्य सरकारला विनंती