नवी दिल्ली : वाढत्या महागाईच्या प्रश्नावरून काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. त्यांनी या संदर्भात ट्विट केलं आहे.
गेल्या एका वर्षात बटाट्यांच्या किंमती जवळपास 100% आणि कांद्याच्या किंमती 50% वाढल्या आहेत. भाजीपाल्यांच्या वाढत्या किंमतींमुळे जनतेचे हाल होत असताना, त्यांची लागवड करणारे शेतकर्यांना त्यांचे भाव मिळत नाहीत आणि त्यांच्यावर कर्जाचा बोजा वाढत आहे. हे सरकार शेतकरी, गरीब आणि मध्यमवर्गीयांचे शत्रू आहे., असं ट्विट करत प्रियांका गांधींनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
पिछले एक साल में आलू के दाम लगभग 100% और प्याज के दाम 50% बढ़े हैं।
जहां एक तरफ जनता सब्जियों के बढ़ते दामों के चलते बेहाल है वहीं इनको उगाने वाले अन्नदाताओं को इनके दाम नहीं मिलते हैं और उन पर कर्ज का बोझ बढ़ रहा है।
ये सरकार किसान, गरीबों एवं मध्यम वर्ग की दुश्मन है।
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) November 2, 2020
महत्वाच्या घडामोडी-
कोल्हापुरात निवडून नाही आलो, तर हिमालयात जाईन- चंद्रकांत पाटील
राज्यात दिवाळीनंतर मंदिरं सुरू होणार- राजेश टोपे
अजिंक्य रहाणे-शिखर धवनची शानदार अर्धशतके; दिल्लीची बेंगलोरवर 6 विकेट्सनी मात
देवा अशा मूर्खांपासून माझ्या कोकणाला वाचव; नितेश राणेंचा शिवसेनेला टोला