“काँग्रेसचा ‘हा’ मोठा नेता भाजपच्या वाटेवर?; पटोलेंच्या कार्यक्रमाला गैरहजर, फडणवीसांच्या कार्यक्रमाला उपस्थिती; चर्चांना उधाण”

0
442

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : पुण्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. भाजप, काँग्रेसला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. काँग्रेसच्या एका दिग्गज नेत्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

काँग्रेस नेते संग्राम थोपटे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या बारामती येथील कार्यक्रमाला उपस्थित न राहता, ते फडणवीसांच्या कार्यक्रमस्थळी हजर होते. त्यामुळे अनेक तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

हे ही वाचा : “ठाकरेंच्या ताकदीत वाढ; डोंबिवलीतील अनेक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हाती बांधलं शिवबंधन”

डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस आणि संग्राम थोपटे यांची भेट झाली. या भेटीविषयी थोपटे यांना विचारलं असता, कामानिमित्त आपण देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती थोपटे यांनी यावेळी दिली. मात्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या कार्यक्रमाला उपस्थित न राहता थोपटे फडणवीसांच्या कार्यक्रमाला उपस्थित असल्याने अनेक चर्चांना उधाण आलं आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

“सांगलीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा वाद पेटला; शिवप्रेमींची पोलिसांसोबत झटापट”

जितेंद्र आव्हाड माफी मागा, नाहीतर…; औरंगजेबबाबत विधानावरून चित्रा वाघ यांचा आव्हाडांना इशारा

“भाजपचं आजपासून मिशन 144; मुंडे भगिनींना पुन्हा एकदा डावललं; राष्ट्रीय अध्यक्षांच्या कार्यक्रमातून मुंडे भगिनींचा पत्ता कट”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here