आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांचं एक ट्विट मोठं चर्चेत आलं आहे. या ट्विटने राज्याचं राजकारण पुन्हा हादरवून सोडलेलं आहे.
संजय शिरसाठ यांनी आपल्या ट्विट मधून उद्धव ठाकरे यांचा महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख असा उल्लेख केलेला आहे. तसेच उद्धव ठाकरे यांचं विधानसभेतलं एक भाषण ही त्यांनी त्या ट्विटला जोडलेलं आहे.त्यामुळे संजय शिरसाट हे आता उद्धव ठाकरेंकडे परतीच्या वाटेवरती आहेत का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
हे ही वाचा : कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ; पाणी पातळीत ‘इतक्या’ फुटांनी वाढ, एनडीआरएफची टीम सांगलीत होणार दाखल
शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये उद्धव ठाकरे दिलेलं वचन आम्ही पाळतोच आणि दिलेला शब्द हा खरा करून दाखवतोच, असं म्हणताना दिसत आहेत.
दरम्यान, संजय शिरसाट यांची अलीकडेच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात वर्णी लागलेली नाहीये. त्यामुळे संजय शिरसाठ यांना मंत्रिपदाचे वचन मिळालं होतं का? आणि ते वचन पूर्ण झालं नाही, म्हणून शिरसाठ यांचे हे संकेत आहेत का? असा सवाल उपस्थित होत आहे. मात्र काही वेळातच त्यांनी हे ट्विट डिलीटही केलं.
महत्त्वाच्या घडामोडी –
मनसेत पक्षप्रवेशाचं वारं; रक्षाबंधनाला असंख्य महिलांनी धरला मनसेचा झेंडा
पात्रता नसेल म्हणून…; मंत्रीमंडळ विस्तारावरुन पंकजा मुंडेंची नाराजी पुन्हा उघड
आतापर्यंत मी शांत होतो, पण…; पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी, मंत्री संजय राठोड यांचा इशारा