आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या शिरूर मतदारसंघात अजित पवार गटाकडून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील तर शरद पवार गटाकडून विद्यमान खासदार अमोल कोल्हे अशी तुल्यबळ लढत झाली होती. यामध्ये आढळराव पाटील यांना पुन्हा पराभवाचा धक्का बसला.
महायुतीच्या जागावाटपमध्ये शिरूरची जागा अजितदादा गटाने मागून घेतली होती. त्यामुळे 26 मार्च रोजी शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. परंतु अमोल कोल्हे यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. मात्र आता राष्ट्रवादीचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी घरवापसी करावी अशी मागणी शिवसैनिकांनी केली आहे.
ही बातमी पण वाचा : राज ठाकरे भाजपाच्या हातचं बाहुलं झालेत; ठाकरे गटाचा टोला
शिवाजीराव पाटील यांनी शिरूर येथे आखाड पार्टीचे आयोजन केले होते. यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. शिवसेना जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर आणि हवेली तालुका शिवसेनेचे अध्यक्ष विपुल शितोळे हे देखील या पार्टीला उपस्थित होते. या नेत्यांनी आढळराव पाटील यांना पुन्हा स्वगृही परतण्याची विनंती केली.
दरम्यान, कार्यकर्त्यांचे हे प्रेम पाहून आढळराव पाटील भावूक झाले होते. त्यामुळे ते घरवापसी करणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
मोठी बातमी ! शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट
अजितदादा-शरद पवार पुन्हा एकत्र येणार?; राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराचं सूचक वक्तव्य
भारताची विजयी सलामी; पाकिस्तानवर 7 विकेट्सने शानदार विजय