आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात बंड करून स्वतंत्र गट निर्माण केला. शिवसेना भाजप युती सरकारमध्ये अजित पवार यांनी मंत्री म्हणून शपथ घेतली. राष्ट्रवादीत पडलेल्या या फुटीमुळे पक्षातील काही आमदारांना थेट निर्णय न घेता तटस्थतेची भूमिका घेतली आहे.
शरद पवार ही यांना सोडून जाता येत नाही, आणि अजित पवार यांनाही सोडून जाता येत नाही.तर थेट विरोधही करता येत त्यामुळे ‘इकडे आड आणि तिकडे विहीर’ अशी या आमदारांची तसेच काही पदाधिकाऱ्यांची अवस्था झाली आहे.पण अजित पवार यांची साथ देऊनही एका बड्या नेत्याने थेट निवडणूक लढवणार नाही असे वक्तव्य केलं आहे. तर आणखी एका आमदार आणि खासदारानेही तशीच भूमिका घेतली आहे.
राष्ट्रवादी आमदार अतुल बेनके, मंत्री दिलीप वळसे पाटील आणि खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी निवडणूक लढणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
ही बातमी पण वाचा : शरद पवारांचा सैतान म्हणून उल्लेख करणाऱ्या सदाभाऊ खोतांना, आता रूपाली चाकणकरांचा इशारा, म्हणाल्या…
माझी भूमिका तटस्थ आहे. विकास कामासाठी ज्यांच्याकडे जावे लागेल. त्यांच्याकडे मी जाणार आहे. पण, पक्ष आणि राज्यातील ही राजकीय परिस्थिती पाहता 2024 ची विधानसभा निवडणूक लढविण्याची माझी मानसिकता नाही. मी निवडणूक लढविणार नसलो तरी समाज कार्यात कार्यरत असेल, असं अतुल बेनके म्हणाले आहेत.
दिलीप वळसे पाटील यांनी अजित पवार यांच्यासोबत मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, त्यांनीही आगामी निवडणूक लढणार नाही, असं वक्तव्य केलंय.
दरम्यान, अजित पवार यांच्या शपथविधी वेळी उपिस्थत असलेले शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दुसऱ्याच दिवशी खासदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय जाहीर केला. पक्षात पडलेली फूट आणि झालेली द्विधा मनस्थिती यामुळे हा निर्णय घेत असल्याचे ते म्हणाले.
महत्त्वाच्या घडामोडी –
“राष्ट्रवादीतल्या बंडावर, विधानसभा अध्यक्षांचं मोठं विधान, म्हणाले, …तोपर्यंत व्हीपचा निर्णय…”
“मोठी बातमी! विराट कोहली पुन्हा एकदा कर्णधारपदी विराजमान?”
“मोठी बातमी! पुण्यात पंतप्रधान मोदी, अजित पवार-शरद पवार ‘या’ दिवशी एकाच मंचावर एकत्र येणार?;”