मुंबई : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दोन पानी पत्रं लिहलं. सरनाईक यांच्या या पत्रानंतर राजकारणात खळबळ उडाली आहे. यावर मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
मागील 5 वर्षात भाजपनं शिवसेनेला दिलेली वागणूक सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे शिवसेना भाजपसोबत जाणार नाही, असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.
भाजप पक्षाने शासकीय यंत्रणांचा वापर करून दबावतंत्र अवलंबवलं आहे. त्याचा त्रास आमदारांना होत असल्याचं पाहायला मिळतंय या त्रासामुळेच आमदार प्रताप सरनाईकांनी आपली व्यथा मांडली आहे, असं थोरातांनी सांगितलं.
दरम्यान, भाजपला दूर ठेवण्यासाठी विरोधकांना एकत्र करण्याचं काम शरद पवार यांनी याआधीही केलं आहे. ते संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात यूपीएचेही महत्वाचे घटक आहे, असंही बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत.
महत्वाच्या घडामोडी –
“मुख्यमंत्र्यांच्या घरबशा कारभारामुळे महाराष्ट्रातली स्मशाने अखंड धगधगतायत”
“बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा मुख्यमंत्री झाला हे भाजपला बघवत नाही”
“हिंगणघाटमध्ये भाजपला मोठा धक्का; आजी-माजी 12 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश”
“पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसलेंची तब्बल 40 कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त”