…म्हणून लोकसभा निवडणुकीत भाजपनं किरीट सोमय्यांच तिकीट कापलं- नवाब मलिक

0
247

मुंबई : भाजपाचे नेते किरीट सोमय्या हे बेजबाबदार वक्तव्य करण्यास प्रसिद्ध आहेत. त्यामुळेच मागील लोकसभा निवडणुकीत त्यांचे पक्षाने तिकीट कापलं होतं. त्यामुळे असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी किरीट सोमय्या यांच्यावर निशाणा साधला.

भाजपाचे नेते किरीट सोमय्या ज्यापध्दतीने बोलत आहेत ते बेजबाबदारपणाचे आहे. त्यामुळे  किरीट सोमय्या यांच्या वक्तव्याला गांभीर्यानं घेण्याची गरज नाही, असं नवाब मलिक म्हणाले.

वाधवान प्रकरणी बातमी आल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन त्या प्रकरणाची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच अमिताभ गुप्ता यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे, असंही नवाब मलिक यांनी सांगितलं.

महत्वाच्या घडामोडी-

उद्धवा महाराष्ट्र तुझ्या खांद्यावर उभा आहे, सगळी जबाबदारी तू उत्तमरित्या पेलतो- सिंधुाताई सपकाळ

औरंगाबादेत शिवीगाळ करत युवकांनी केली पोलीसांना मारहाण; पाहा व्हिडीओ

शिवभोजन एकदाच मिळतं, दुसऱ्यांदा लोकांनी उपाशी राहावं का?; देवेंद्र फडणवीसांचा सवाल

तबलिगी प्रकरणावरुन राजकारण करू नका- देवेंद्र फडणवीस

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here