Home महाराष्ट्र ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; जलयुक्त शिवार योजनेची एसआयटी मार्फत खुली चौकशी होणार

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; जलयुक्त शिवार योजनेची एसआयटी मार्फत खुली चौकशी होणार

मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही ड्रीम योजना असलेल्या जलयुक्त शिवार या योजनेची एसआयटी मार्फत चौकशी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या योजनेवर कॅगने ताशेरे ओढले होते. त्या अनुषंगानेच ही चौकशी होणार आहे.

10 हजार कोटी या योजनेवर खर्च केले गेले. मात्र कॅगने असं म्हटलं आहे की या योजनेचा काहीही उपयोग झालेला नाही. पाण्याची पातळी वाढलेली नाही त्यामुळे या योजनेची कॅगच्या अहवालानुसार चौकशी केली जाणार आहे, अशी माहिती राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.

दरम्यान, या चौकशीला महाराष्ट्र कॅबिनेटतर्फे मान्यता देण्यात आली आहे, असंही गुलाबराव पाटलांनी  म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“आम्ही तोंड उघडलं तर तुम्हाला तोंड लपवायला जागा ठेवणार नाही”

दिल्ली कॅपिटल्सचा आणखी एक विजय; राजस्थानवर 13 धावांनी मात

शिखर धवन व श्रेयस अय्यरची शानदार अर्धशतके; दिल्लीचे राजस्थानसमोर 162 धावांचे लक्ष्य

दिल्लीत सहा वर्षांपासून कोणाचा बाप बसलाय; चंद्रकांत पाटलांचा राष्ट्रवादीला पलटवार