“दरेकरांच्या मनात अश्लील अर्थ नव्हता, त्यामुळे उगीच पराचा कावळा करू नये”

0
886

आमच्या सर्व बातम्या मिळवण्या साठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : सुप्रसिद्ध लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांच्यासह काही कलाकार 16 ऑक्टोबरला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. यावर प्रतिक्रिया देताना भाजप नेते प्रवीण दरेकर यांची जीभ घसरली होती. त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टीकरण दिलयं.

प्रविण दरेकर यांनी जे विधान केले, ज्या शब्दाचा वापर केला ते शब्द बोलीभाषेत वापरले जाते. त्याचा एवढा बाऊ करण्याची गरज नाही. आपण दररोजच्या बोलण्यात असे शब्द वापरत असतो. त्यामुळे उगीच पराचा कावळा करू नये. त्याचा अर्थ वेडावाकडा घेऊ नये. प्रवीण दरेकरांच्या मनात अश्लील अर्थ नव्हता, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी सारवासारव केली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) गरीब लोकांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा ‘रंगलेल्या गालाचा’ मुका घेणारा पक्ष आहे, असे म्हणत टीका प्रविण दरेकरांनी केली होती.

महत्वाच्या घडामोडी –

अतुल भातखळकरांचं डोकं फिरलंय, मुख्यमंत्र्यांविरोधात दाखल केलेल्या तक्रारीवरून मनिषा कायंदे यांचा घणाघात

खासदार सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ निर्णयाचं केलं स्वागत, म्हणाल्या…

…तर यांचे आमदार मंत्री बगलबच्चे धार्जिणे आहे; ज्योती देवरेंच्या बदलीवरून चित्रा वाघ यांचा सरकारवर घणाघात

मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करा, भाजप आमदार अतुल भातखळकरांची थेट पोलिसात तक्रार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here