नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर खासदार नवनीत राणा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या मंगळवारी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.
मुख्यमंत्री लायक असते तर इथं येण्याची गरज नव्हती. आईबाप हे मुलांसाठी कधी रडत नसतात. उद्धव ठाकरे यांना विविध विषयांच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी यांना भेटायचे होते. ही संधी त्यांनी साधली, असं नवनीत राणा म्हणाल्या आहेत.
दरम्यान, अमरावतीच्या जनतेने ज्यांना पराभूत केले ते उत्साहाच्या भरात न्यायालयात गेले. आता मला भविष्यात सर्वोच्च न्यायालयाकडून न्यायाची अपेक्षा आहे. मी न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करते. माझी शिवसेनेसोबतची राजकीय लढाई सुरु राहील, असं म्हणत त्यांनी उच्च न्यायालयात जात प्रमाणपत्र रद्द झाल्याच्या निकालासंदर्भातही त्यांनी प्रतिक्रिया दिली.
महत्वाच्या घडामोडी –
“नवनीत राणा तुमच्यामध्ये थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल तर खासदारकीचा राजीनामा द्या”
“सत्तेत एकत्र नसलो तरी नातं तुटलेलं नाही”; मोदींच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रीया
किती हे असंवेदनशील सरकार; पुण्यातील मुळशी दुर्घटनेवरून भातखळकरांची मुख्यमंत्र्यांवर टीका