पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्यामुळे स्वप्नील लोणकर या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. त्यानंतर 31 जुलै अखेर सर्व नियुक्त्या करण्यात येतील,अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती. मात्र अद्याप पदे भरलेली नाहीत. त्यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांवर निशाणा साधलाय.
अजित पवारांसारखा वेळ पाळणारा आणि शब्दाला जागणारा दुसरा माणूस नाही अशी ओळख आहे. पण आता एमपीएससीच्या जागा भरण्याबाबत विधिमंडळात दिलेला शब्द जर ते फिरवत असतील तर मग कठीण आहे, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांवर टीका केली. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील बोलत होते.
दरम्यान, असे प्रत्येक विषयातच वेळ मारून नेण्याचे काम महाविकास आघाडी सरकारकडून सातत्याने सुरु आहे. हे अत्यंत खोटारडे सरकार आहे. मात्र हे सगळं निवडणूक होईपर्यंत चालतं, पण नंतर कळतं. महाविकास आघाडी सरकारला लोक धडाशिक विल्याशिवाय राहणार नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
महत्वाच्या घडामोडी –
“नारायण राणेंनी शिवसेना सोडली, तेंव्हा संजय राऊत बाथरूममध्ये लपले होते”
राज ठाकरे हे माझे आवडते राजकीय व्यक्तिमत्व, लवकरच त्यांची भेट घेणार- चंद्रकांत पाटील
मुख्यमंत्र्यांच्या दाैऱ्याला जेवढा खर्च, कोकणातील पूरग्रस्तांना तेवढीही मदत नाही; निलेश राणेंची टीका