मुंबई : कोरोनावर मात करुन शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पुनरागमन केलं आहे.
वाढत्या कोरोनाग्रस्तांची रुग्णसंख्या पाहता वरळी मतदारसंघातील नेहरु सायन्स सेंटरमध्ये 150 बेड्स तर पोद्दार रुग्णालयात 225 बेड्सचं अद्यावत सोयीसुविधा असलेलं कोविड सेंटर उभारण्यात आलं आहे. या सेंटरचं उद्घाटन आदित्य ठाकरेंच्या हस्ते करण्यात आलं. या उद्घाटन प्रसंगी आदित्य ठाकरेंनी सध्या सुरु असलेल्या राजकारणावर भाष्य केलं.
कोरोना काळात जे राजकारण सुरु आहे, ते सुरु राहू द्या, त्याकडे लक्ष द्यायची गरज नाही. लोकांचा जीव महत्त्वाचा आहे. एवढंच नव्हे तर लसीवरुन जे काही सुरु आहे त्याबद्दल मी काही सांगायची गरज नाही, असं आदित्य ठाकरे म्हणाले. तसेच लवकरच मी फिल्डवर ॲक्टिव्ह होईन, असा विश्वास देखील आदित्य ठाकरेंनी यावेळी व्यक्त केला.
दरम्यान, या हाॅस्पिटलमध्ये जवळपास 70 टक्के ऑक्सिजन बेड्स उपलब्ध आहेत, त्यामुळे रुग्णांना याचा जास्तीत जास्त फायदा होणार आहे.
महत्वाच्या घडामोडी –
कर्णधार संजू सॅमसनची आक्रमक शतकी खेळी व्यर्थ; पंजाब किंग्सचा शेवटच्या चेंडूवर विजय
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ‘सीबीआय’चं समन्स; 14 एप्रिलला होणार चौकशी