पुणे : राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी राजकीय नेत्यांना पूरग्रस्त भागातले दौरे टाळण्याचं आवाहन केलं होतं. मात्र, त्यानंतर आमदार रोहित पवार यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा केला. रोहित पवारांच्या या दौऱ्यावरुन आमदार नितेश राणे रोहित पवारांना टोला लगावला आहे. याला आता रोहित पवारांनीही उत्तर दिलंय.
सोशल मीडियावर ट्वीट करुन मोकळं व्हायचं. मात्र, प्रत्यक्ष कुठेही जायचं नाही. त्यामुळे या लोकांना महत्व देण्याचं कारण नाही, असं रोहित पवार म्हणाले आहेत.
दरम्यान, सातत्याने पवार कुटुंबात विसंगती दिसते. अवेळी बोलणं, जास्त बोलणं हे कधीच पवार कुटुंबीय करत नाही. पार्थ पवार ,सुप्रिया सुळे अस बोलताना कधी दिसले नाहीत. रोहीत पवारांनी आपल्या आजोबांकडून योग्य गोष्टी शिकल्या पाहिजेत. त्यांचं ऐकलं पाहिजे. नातूच आजोबांचा विचार पाळत नसेल तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी का पाळावे असा प्रश्न सगळ्यांच्या समोर येतो. म्हणून रोहीतजींनी थोडं शिकून मगच पावलं टाकावीत असा माझा मैत्रीचा सल्ला आहे, असा टोला नितेश राणे यांनी लगावला होता.
महत्वाच्या घडामोडी –
पूर संरक्षक भिंत चीनच्या भिंतीसारखी सरसकट बांधता येणार नाही; फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना टोला
“कोल्हापुरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस पाहणी करत असताना एकमेकांना समोरासमोर भेटले”
“…तर त्यांचे हातपाय तोडू, हा महाराष्ट्र आहे, इथं फक्त राज ठाकरेंचं राज चालतं”
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल; शिरोळ, नृसिंहवाडीत पूरस्थितीची केली पाहणी