मुंबई : राज्यात एकूण चाचण्यांची संख्या कायम ठेवताना मुंबईतील चाचण्यांची संख्या मात्र 50 टक्क्यापेक्षा अधिक संख्येने कमी करण्यात आल्या आहेत. तसंच राज्यात मृत्यूसंख्येत सातत्याने होत असलेली वाढ. यावरुन विरोध पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहलं आहे.
सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या मुंबईत होत होत्या. 15 मे 2020 रोजी हे प्रमाण 40.05 टक्क्यांवर आणण्यात आले आणि आता 31 मे 2020 रोजीची आकडेवारी पाहिली तर एकूण महाराष्ट्रातील चाचण्यांच्या तुलनेत मुंबईतील चाचण्यांचे प्रमाण हे 27 टक्क्यांवर आले आहे. म्हणजेच पूर्वी होणार्या चाचण्यांपैकी 50 टक्क्यांहून कमी झाल्या आहेत, असं देवेंद्र फडणवीस यांनी पत्रात म्हटलं आहे.
दरम्यान, करोनाचा सर्वाधिक प्रभाव असलेल्या मुंबईत चाचण्यांची कमी होणारी संख्या ही निश्चितच चिंताजनक बाब आहे. एकीकडे चाचण्यांची संख्या कमी होणे आणि दुसरीकडे करोनाबळींच्या संख्येने नवीन उच्चांक गाठले जात आहेत, असंही देवेंद्र फडणवीस यांनी या पत्रात नमुद केलं आहे.
मुंबईत मोठ्या प्रमाणात कमी होत असलेल्या चाचण्या, राज्यात मृत्यूसंख्येत सातत्याने होत असलेली वाढ तसेच मृत्यू प्रमाणपत्रात नैसर्गिक अथवा अन्य कारण नमूद करून अंत्यविधीसाठी मृतदेह दिले जात असल्याने निर्माण झालेले धोके याकडे मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे यांना पत्र @CMOMaharashtra pic.twitter.com/YIAPhLQ881
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 4, 2020
महत्वाच्या घडामोडी-
वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का; दोन माजी आमदारांचा राष्ट्रवादीत प्रवेश
महाराष्ट्रावर विठू माऊलींचे आशीर्वाद आणि मुंबा देवीची कृपा, म्हणून निसर्ग चक्रीवादळाचं संकट टळलं
‘महाराष्ट्रा काळजी घे’ ; मनसेचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन
आम्ही तुमच्या पाठिशी आहोत; अरविंद केजरीवालांचं उद्धव ठाकरेंना टि्वट